शिक्षकांना बि.एल.ओ. कामाची सक्ती करू नये
सी.ई.ओ. व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यात बि.एल.ओ. हे मतदार नोंदणी चे काम प्राथमिक शिक्षकांना देण्यात येत आहे ज्यात शिक्षकांचे शारीरिक व मानसिक श्रम खर्च होणार आहे, अनेक शैक्षणिक कार्यदिन वाया जाणार आहे त्यामुळे शिक्षकांना या कामातून मोकळे करावे या मागणीसाठी जिवती, चिमूर, वरोरा, पोम्भूरणा तालुक्यातील शेकडो शिक्षकांच्या सह्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांना पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले.
इकडे शिक्षकाकडून विद्यार्थी सर्वांगीण विकासाची अपेक्षा करायची व त्याच्या मागे अनेक अशैक्षणिक कामे लावून द्यायची त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन गंभीर आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. बि.एल.ओ. चे काम वर्षातून एक किंवा 2 वेळा असतेच त्यातल्या त्यात एका शिक्षकांकडे एकापेक्षा अधिक गावांचे काम असते त्यामुळे शालेय कार्य सांभाळून काम करणे अशक्यच आहे करिता शाळा सोडून काम करावे लागते त्यामुळे शाळेचे मोठे नुकसान होते आणि यावेळी मोबाइल अँप वर काम करायचे आहे मात्र प्रशासन मोबाइल पुरवत नाही त्यांना अश्या कामाची सक्ती करायला. शिक्षकांचे मोबाईल ही राष्ट्रीय संपत्ती आहे का ?
याबाबत राज्यभर शिक्षक घसा कोरडा करून ओरडत आहेत की हे काम आम्हाला आमचे काम प्रामाणिकपणे करण्यास अडसर निर्माण करत आहे करिता देऊ नका मात्र शिक्षक हे शैक्षणिक कामासाठी असतात हे विसरून त्यांना बाबूगिरीचे असे एक ना अनेक कामे जबरीने थोपवले जातात.
करिता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना बि.एल.ओ. च्या कामातून मुक्त करावे अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस, रवी सोयाम जिल्हा सरचिटणीस, सुनील जाधव जिवती तालुका अध्यक्ष, मनोज बेले सरचिटणीस चंद्रपूर, पंकज उध्दरवार, विपीन धाबेकर, मनोज चव्हाण व बि.एल.ओ. काम दिलेल्या असंख्य शिक्षकांनी निवेदनातून केली आहे.