गोंडखैरी परिसरातील देशोन्नती प्रेसच्या बाजूने बिसलरी कंपनी जवळील घटना
नागपूर / अरुण कराळे :
नागपूर पासून १५ कि .मी. अंतरावरील गोंडखैरी येथील तरुण हा बिसलरी कंपनीत कामगार असून त्याच कंपनीजवळ त्या तरुणाची निर्घुण हत्त्या करण्यात आली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी परिसरातील देशोन्नती प्रेसच्या बाजुने बिसलरी कंपनीजवळ रविवार २३ जुन सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
धिरज उर्फ दादु रमेश ठक वय २७ राहणार वार्ड क्रंमाक पाच गोंडखैरी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील रहीवासी असून शेजारी असलेल्या बिसलरी कंपनीत सकाळी ९.३० वाजता कामावर जायचा. नेहमीप्रमाणे सकाळी ७.०० वाजतादरम्यान ब्रश करीत असताना घराबाहेर निघाला तो सरळ राष्ट्रीय महामार्गाने बिसलरी कंपनीच्या दिशेने गेला असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबांनी दिली.
धिरज हा शांत स्वभावाचा असून कुस्तीगिर (पहेलवान) होता. हा बिसलरी कंपनीत कामावर असल्यामुळे सकाळी गेलेला परत घरी न आल्यानी घरच्यांना वाटले की कंपनीत कामावर गेला असावा. नंतर शोधाशोध केली असता बिसलरी कंपनीत कामावर न आल्याची माहिती मिळाली. पुन्हा शोधाशोध व मित्रांना याबाबत विचारणा केली असता नकार मिळाला. व दुरध्वनी संपर्क बंद असल्याने नातेवाईकांकडे याबाबत विचारपूस करण्यात आली. पण नकार मिळाला.
सायंकाळी ६.३० सुमारास अचानक राष्ट्रीय महामार्गावर कंपनीजवळील एका खंडर खोलीत अज्ञात व्यक्तीची रक्त बंबाळ अवस्थेत हत्त्या झालेली दिसून आली. व बघ्याची गर्दी वाढू लागली. गर्दीतील एका इसमाने कळमेश्वर पोलीसठाण्यात संपर्क करुन सदर माहीती देण्यात आली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. व पंचनामादरम्यान अज्ञात इसमाची ओळख पटू लागली. स्थानीक रहीवासी असल्याची माहिती मिळताच मृतकाच्या कुटूंबाना घटनास्थळावर बोलवून ओळख पटवून देण्यात आली.
घटना लिहेपर्यंत हत्त्येचे कारण गुलदस्त्यात असून कळू शकलेले नाही. मृतकाला उत्तरीय तपासणीकरीता कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास कळमेश्वर पोलीस निरिक्षक मारोती मुळूक यांंच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक सुशिल धोपटे, दिनेश गावंडे, हेडकाँस्टेबल दिलीप सपाटे, प्रकाश उईके, डिएनपीसी अनिल जांभेकर, पिसी आशिष बोरकर अधिक तपास करीत आहे.