Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून १९, २०१९

भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर


ग्रुप रेनोची नवीकोरी, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर  

  • नवी दिल्ली, 19 जून 2019: रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन आहे, जे विशेषतः भारतीय बाजारपेठांसाठी डिझाईन केले आहे.

“ग्रुप रेनोकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. भारतात आम्ही नवतरुण आहोत, तरीही आमच्या महत्त्वाकांक्षा ही आमची धोरणात्मक योजना "ड्राईव्ह द फ्युचर" प्रमाणे मोठी आहे. 2022 पर्यंत आम्हाला आमची विक्री दुप्पट करायची आहे. या कारणास्तव आम्ही रेनो ट्रायबर ही आणखी एक अद्वितीय संकल्पना घेऊन आलो आहोत. जी प्रमुख भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. रेनो ट्रायबरचा जन्म, विकास आणि निर्मिती भारतातील आहे, भारतीय ग्राहकांचा प्राधान्याने विचार करून ती बनविण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याआधी ती भारतात उपलब्ध होईल. हे वाहन खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे," असे ग्रुप रेनोचे सीईओ थिएरी बोल्लोरे रेनो ट्रायबरच्या अनावरणाप्रसंगी म्हणाले.  

रेनो ट्रायबरच्या डिझाईनिंग इनोव्हेशनविषयी बोलताना ग्रुप रेनोचे एक्झिक्युटीव्ह वाईस-प्रेसिडेंट लॉरेन्स वॅन देन ऍकर म्हणाले की, "ट्रायबर सोबत आमचे उद्दिष्ट्य हे आमच्या ग्राहकांच्या आयुष्यातील अनेक गरजांनुरूप परिवर्तन आणण्याचे आहे. मग हे ग्राहक पालक असू द्या, चाहते असो, मित्रांचा गट किंवा मग कुटुंबियांचा समूह असो, त्यांची ट्राईब (प्रकार) कोणतीही असली रेनो ट्रायबर त्यांना साजेशी ठरेल. ट्रायबरने भारतीयांची उत्सवप्रियता आणि शेअरिंग करण्याची नैतिक मूल्ये जपली आहेत; जी रेनोमध्ये एकसमान आढळतात. हे उत्पादन आकर्षक, वेगवान आणि संक्षिप्त डिझाईन उपलब्ध करून देते, यामधील जागेचे देखील पुन्हा नियोजन करण्यात आले आहे. आम्हाला आमच्या आधुनिक अद्वितियतेचा अभिमान वाटतो, ज्यामुळे 4 मीटरमध्ये लांबीचे आव्हान जादुईरित्या पूर्ण केले आहे!"


रेनो ट्रायबर: भारताकरिता अनोखे वाहन
रेनो ट्रायबर हे आकर्षक डिझाईन असलेले दणकट, संक्षिप्त, तरीही भरपूर जागा असलेले, मॉड्युलर, अष्टपैलू वाहन आहे, ज्यामध्ये चार मीटरहुन कमी जागेत सात प्रौढ व्यक्ती अगदी सहज बसू शकतात. रेनो ट्रायबर अतिशय विचारपूर्वक आणि भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांचे संपूर्ण विश्लेषण करून तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये अद्वितीय लवचिकता दडली आहे. रेनो ट्रायबर हा खरा गेम चेंजर असून हे आधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा-मॉड्युलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे, ज्यामध्ये आकर्षक इंटेरिअरसह अनेक आधुनिक आणि वास्तविक वैशिष्ट्ये आहेत. रेनो ट्रायबर त्याच्या कॅटेगरीमधील असे वाहन आहे, ज्यामध्ये पाच-सीटर प्रकारात सर्वाधिक बूट कपॅसिटी दिसून येते.  
ग्रुप रेनोच्या विकासाच्या दृष्टीने भारत ही एक प्रमुख बाजारपेठ आहे, रेनो ट्रायबरसोबत ग्रुप रेनोचे ध्येय भारतात विस्ताराला चालना देण्याचे आहे. त्यांच्या धोरणात्मक योजनेचा म्हणजे ड्राइव्ह द फ्युचरचा भाग म्हणून ग्रुप रेनोचे उद्दिष्ट्य विक्री 40% नी वाढवण्याचे आहे. 2022 पर्यंत वाहने 5 दशलक्षांहून अधिक वाढविण्याचे ध्येय आहे. आगामी तीन वर्षांत भारतात वार्षिक 200,000 युनिट्ससोबत विक्री क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. रेनो ट्रायबरची निर्मिती चेन्नई प्रकल्पात होणार असून 2019 च्या द्वितीय अर्धसत्रात भारतीय बाजारपेठांत स्पर्धात्मक किंमतीत वाहनांची विक्री होईल.      
“जागा आणि मॉड्युलरीटीमध्ये रेनो ट्रायबरने नावीन्य आणले आहे, जे ग्राहकांचे विस्तारीत सेगमेंट लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे, जे बी-सेगमेंटने अग्रेसर आहे. रेनो ट्रायबर म्हणजे भारतीय टीमच्या तज्ञतेची पोचपावती म्हणावी लागेल, त्यांनी भारतीय ग्राहक सखोलपणे समजून घेतले आहेत, आपली कौशल्यपूर्ण अभियांत्रिकी क्षमता, डिझाईनमधील संपूर्ण तज्ज्ञता आणि बळकट निर्मिती क्षमतांचा अवलंब केला आहे. भारतीय ग्राहकाना किंमतीच्या मोबदल्यात सर्वोत्तम उत्पादनाची अपेक्षा असते. आणि रेनो ट्रायबर त्यांना अत्याधुनिक डिझाईन, आधुनिक वैशिष्ट्ये, आधी कधीही नव्हती इतकी प्रशस्त जागा, मोकळा वाव आणि सोबत अष्टपैलूत्व देते. रेनो ट्रायबर केवळ एक कार नसून, त्याहून अधिक असा अद्वितीय मापदंड आहे. जो आमच्या मध्यम-कालावधी उद्दिष्ट्यात मुख्य भूमिका बजावेल, भारतातील आमची विक्री दुप्पट करेल," असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम ममीलापल्ले म्हणाले.  
रेनो ट्रायबर:  अर्थपुर्ण आणि आकर्षक स्टाईल
भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमच्या संयुक्त प्रयत्नातून रेनो ट्रायबरची निर्मिती झाली आहे, याचे अंतर्गत डिझाईन अतिशय अनोखे, आधुनिक आणि आकर्षक आहे, चार मीटरहुन कमी जागेत धमाकेदार आणि दणकट उत्पादन तयार करण्यात आले असून यामध्ये सर्वोत्तम जागा ठेवण्यात आली आहे.




लक्षवेधी देखणेपण
रेनो ट्रायबरचा लूक सर्वांत उठून दिसणारा आहे, त्याशिवाय पातळ आणि ठळक रेषा, याची शोभून दिसणारी विंडस्क्रीन व रियर विंडो तसेच स्लाईट रूफ ड्रॉप देखणेपण अधोरेखित करते. याचे बॉडी-फोल्ड डोअर हॅन्डलकडे येतात व थेट विंग शोल्डरपर्यंत विस्तारित होतात.

नजरेला दिसणारा वेग
याचे नवीन फ्रंट-बंपर दणकटपणा व आधुनिकपणा दर्शवतात, तसेच सर्वात कठीण रस्त्यांवर याची सर्वाधिक क्षमता दाखवतात. याचा ग्राउंड क्लिअरन्स  182 एमएमचा असून हे याच्या वेगवानपणाचे प्रतीक आहे, इतर वैशिष्ट्यांमध्ये याचे स्कल्पटेड बोनेट, फ्रंट आणि रियर एसयूव्ही स्किड प्लेट्स, रूफ बार्स व ब्लॅक प्लास्टीक व्हील आर्क प्रोटेक्शन आणि लोअर प्रोटेक्टीव्ह डोअर पॅनल्स वाहनाला साहसी लूक प्रदान करतात, त्याला सर्वप्रकारच्या रस्त्यांसाठी साजेसे बनवतात.

अत्याधुनिक फ्रंट-एंड
रेनो ट्रायबरचा फ्रंट-एंड हा समकालीन आणि अत्याधुनिक आहे, ज्यामध्ये सिग्नेचर रेनो डिझाईन वैशिष्ट्ये जसे की एलईडी डेटाईम रनिंग लाईट सरकल्ड क्रोम व ब्लॅक हेडलॅम्प मास्क्समध्ये देण्यात आले आहेत. रेनोचा लोगो हा ट्रिपल एज क्रोम फ्रंट ग्रीलवर अधोरेखित करण्यात आला असून त्याचा विस्तार प्रोजेक्टर हेडलॅम्पपर्यंत आहे. हेडलॅम्पमुळे योग्य दृश्यता राहते,शिवाय रेनो ट्रायबरला देखणा लूकही मिळतो.

खंबीर रिअर-एंड
दोन भाग असलेले रिअर ईगल बिक टेल लॅम्प विंग्जचा बाहेरील भाग विस्तारीत आहेत व टेलगेटच्या मध्यावरील केंद्रावर येतात, यामुळे वाहनाला विस्तारीत स्वरूप मिळते. एसयूव्ही स्किड प्लेट्स बम्परपर्यंत देण्यात आल्या असून त्यामुळे वेग अधोरेखित होतो.

रेनो ट्रायबरच्या आत: परिवर्तनशील, सामायिकीकरण आणि आधुनिकता  

रेनो ट्रायबरच्या आतमधील आधुनिक इंटिरिअर अग्रगण्य तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून त्यामुळे प्रत्येक दिवस आरामदायक आणि सोप्या उपयोगासाठी असेल. प्रवासी कप्पा किंवा कम्पार्टमेंटची आखणी परिवर्तनशील आणि प्रवाशाला आनंदी ऑन-बोर्ड अनुभव घेण्याच्या दृष्टीने बनविण्यात आला आहे.

मोहक आणि उच्च दर्जाचे वातावरण सोबत प्रत्येक बारीक तपशीलावर लक्ष
रेनो ट्रायबरच्या अंतर्गत सजावटीत उबदारपणा आणि टू-टोन रंगाचा वापर केल्याने स्वतःचे असे व्यक्तिमत्व आहे. डॅशबोर्डवरील वरच्या भागाला गडद काळा तर खालील भागाला आणि डोअर ट्रीम्सला बेज व व्हाईट टोन ठेवण्यात आला आहे. ही रंगसंगती सामान्यपणे मोहकतेशी मिळतीजुळती आहे व तिला एक उच्च दर्जा आहे. याच्या एअर व्हेंट्सवर, एअर कण्डिशन्ड डायल्स, स्टार्ट/स्टॉप बटणावर, डॅशबोर्डवरील सिल्व्हर असेंटवर क्रोम ट्रिम असून सिल्व्हर डोअर हॅन्डल आणि डोअर आर्मरेस्टवर कापडाला स्पर्श केल्याचा आनंद मिळतो, यामुळे कारला एकंदर व्हिज्युअल अपील मिळते.  

या श्रेणीतील सर्वोत्तम स्टोरेज
प्रवाशाच्या आरामाचा विचार करून पहिल्या आणि दुसऱ्या सीटच्या मध्यभागी मध्यवर्ती रेफ्रिजरेटेड स्टोरेज एरिया आणि कपहोल्डर्स देण्यात आले आहेत, सर्वांचे हात पोहोचतील अशी जागेची रचना आहे. त्याशिवाय लोअर ग्लोव्ह कंम्पार्टमेंट देखील आहे, हा देखील रेफ्रिजरेटेड असून अप्पर ग्लोव्ह कम्पार्टमेंटची क्षमता चार लिटरहून अधिक आहे. रेनो ट्रायबरमध्ये 31 लिटरपर्यंतची सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेंटची सोय आहे. याच आकाराच्या इतर  हॅचबॅकच्या तुलनेत साधारणपणे दुप्पट व्यवस्था आहे.

मल्टीमीडिया सिस्टीमची जोडणी
रेनो ट्रायबरच्या 20.32 सेमी (8 इंच) मल्टिमीडिया टच स्क्रीनमध्ये मीडियानेव्ह इवोल्युशन मल्टिमीडिया सिस्टीमशी जोडलेले आहे. यामधील स्मार्टफोन रिप्लिकेशन वैशिष्ट्यासमवेत ते अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल  कारप्लेसोबत अनेक ड्रायव्हिंग व मनोरंजक अॅप्सना जोडता येते. यामधील मल्टिमीडिया सिस्टीमवर यूएसबी प्लगच्या साथीने व्हिडियो सुरू करता येतात.

डिजीटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
यामधील आडव्या रेषांमुळे लूक विस्तारित दिसतो. डॅशबोर्ड वर मल्टिमीडिया टच स्क्रीन देण्यात आल्याने वापर आरामदायक ठरतो. यामधील फुलली डिजिटल एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच वापरले गेले आहे) सोबत  8.9 सेमी एलसीडी स्क्रीनवर तीन व्हर्च्युअल गॉज टचमीटर, फ्युएल लेव्हल आणि इंजिन टेम्परेचरसाठी देण्यात आले आहेत.

हॅन्ड्स-फ्री स्मार्ट एक्सेस कार्ड
सुलभ हॅन्ड्स-फ्री कार्डमुले दरवाजे उघड-बंद करता येतात आणि यातील स्मार्ट स्टॉप बटनद्वारे इंजिन सुरू करता येते. त्यासाठी चावीला हात लावण्याची गरज नाही. कार्डमधील सेन्सरमुळे दरवाजे लॉक किंवा अनलॉक करता येतात. त्यासाठी कार्ड पाकिटातून किंवा बॅगेतून बाहेर काढण्याची गरज नाही अथवा कोणतेही बटण दाबण्याची आवश्यकता नाही. यामधील हॅन्ड्स-फ्री सिस्टीममध्ये ऑटो-लॉक फंक्शन आहे, जे चालक वाचनापासून दूर गेल्यावर आपोआप आपले काम चोख बजावते. ज्यामुळे वेळेची बचत होते आणि ते हाताळायला सोयीचे ठरते.  

प्रत्येक रांगेत कार्यतत्पर एअर-कंडिशनिंग
रेनो ट्रायबरच्या रिअर आणि फ्रंट सीटवरून प्रवास करणाऱ्यांची समसमान काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये स्मार्ट पॅकेज्ड ट्वीन एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे, जी प्रत्येक रांगेत आरामदायक कुलींगची खातरजमा करते. दुसऱ्या रांगेतील प्रवाशांना मध्यवर्ती पिलरवर त्यांच्या सोयीचे वेन्ट देण्यात आले आहेत तर तिसऱ्या रांगेत सिलिंगला वैशिष्ट्य एअर वेन्ट्स बसवले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या सुविधेनुसार हवेचा प्रवाह उपलब्ध होतो.  


रेनो ट्रायबर: अतिशय प्रशस्त, आरामदायक आणि अल्ट्रा मॉड्युलर

रेनो ट्रायबरमध्ये एक ते सात जण आरामात मावतात, कारण यामधील अल्ट्रा मॉड्युलरीटी आणि चार मीटरच्या आतील अभिनव लगेज स्पेस.

रेनो ट्रायबर सर्वोत्तम जागा उपलब्ध करून देते तसेच सर्व प्रवाशांना कोणत्याही जागी बसल्यास आरामदायी अनुभव देते. यामध्ये पुढच्या सीटवर सर्वोत्तम कपल डिस्टन्स (710 एमएम)चे आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्तम सेकंड-रो लेग रूम (200 एमएमपर्यंत) व सर्वोत्तम तिसरी रो-लेग-रूम (91 एमएम)ची आहे. सर्वच रांगा समान आरामदायक आहेत. सोबतच त्यात 12V चार्जिंग सॉकेटस आहेत व सर्व प्रवाशांसाठी एअर कंडिशनची सुविधा आहे. यामध्ये उंच प्रवासी देखील अगदी आरामात दोन स्वतंत्र- तिसऱ्या रांगेमधील सीटवर बसू शकतात. याची सर्वोत्तम रूफ हाईट  (834 एमएम) आहे, ज्यामध्ये आर्मरेस्ट बॉडी पॅनल्सना फिट बसतात.

कमाल अष्टपैलुत्व
रेनो ट्रायबरमध्ये स्लायडिंग, रिक्लायनेबल, फोल्डेबल आणि टम्बल सेकंड-रो सीट्ससोबत मोठे डोअर ओपनिंग अँगल्स  (74° रिअर डोअर्सवर) देण्यात आले आहेत, ज्याद्वारे सेगमेंटमधील सर्वोत्तम इंग्रेस आणि इग्रेस देण्यात आली आहे. यामधील पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या इजीफिक्स सीट्स हाताळण्यास सोप्या असून तिसऱ्या रांगेतील स्वतंत्र सीट काढता येते. रेनो ट्रायबरमध्ये एकूण 100 पेक्षा अधिक वेगवेगळी सीट-कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत.  

बसण्याच्या पद्धती (सीटिंग मोडस):

लाईफ मोड: बऱ्याचदा ग्राहकाकडून 5 सीट कॉन्फिगरेशन वापरले जाते, त्यापासून प्रेरणा घेऊन.  सर्वाधिक आरामदायी 5 सीटसोबत स्लायडर + रेकलायनर + ट्विन एसी समवेत कार्यतत्पर एसी वेन्ट्स

ट्राइब मोड: कारच्या नावावरून प्रेरणा घेत, आम्ही कारमधील बसण्याच्या जागेचा पुरेपूर वापर करतो

सर्फिंग मोड: अभिनव आकाराच्या वस्तू सहज सामावून घेतो (उदा: सर्फ बोर्ड) ग्राहक अनुभवाचा भाग म्हणून.

कँपिंग मोड:  2 व्यक्तींसाठी सीटिंग कॉन्फिगरेशन, सर्व जागा मजा-मस्ती आणि साहसाकरीता

सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेंन्ट
रेनो ट्रायबरमध्ये सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेन्ट उपलब्ध आहे (31 लिटर्सपर्यंत) तर सर्वोत्तम बूट क्षमता (625 लिटर्स) फाईव्ह-सीटर कॉन्फिगरेशनसाठी उपलब्ध आहे. सहा जणांकरिता बूट क्षमता 320 लिटर्स तर सात व्यक्तींसाठी 84 लिटर्सची राहील. रेनो ट्रायबर फंक्शनल रूफ रेल्स समवेत येते, ज्याची वजन पेलण्याची क्षमता  50 किलो इतकी आहे.

ऊर्जाक्षम इंजिन आणि अभिनव मंच; जे कामगिरी-संपन्न, खिशाला परडणारा आणि सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव देणारे आहेत

रेनो ट्रायबरचे ऊर्जाक्षम इंजिन भारतीय बाजाराला शोभेल असे आहे, जे कामगिरी आणि इंधन बचतीचे संतुलन राखते. हे वाहन अभिनव अत्याधुनिक मॉड्युलर मंचावर अलीयांसद्वारे तयार करण्यात आले आहे.

हे इंजिन भारतीय वापरकर्त्यांच्या खऱ्या गरजांनुरूप बनविण्यात आले आहे
रेनो ट्रायबरमध्ये 1.0-लिटर 3- सिलेंडर पेट्रोल एनर्जी इंजिन असून त्यातून 72पी' सोबत 96 एनएम टॉर्क निर्मिती होते. यामध्ये फाईव्ह-स्पीड मानवी हाताळणीयुक्त ट्रान्समिशन किंवा फाईव्ह-स्पीड इजी-आर एएमटी आहे. हा एक ग्लोबल पॉवरट्रेन असून आधीच ग्रुप रेनोच्या युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील क्लिओ आणि सँडेरोमधील बी सेगमेंट कारमध्ये वापरण्यात आला आहे. हे ड्युएल व्हीव्हीटी सिस्टीमप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून इंजिन सर्व रेव्ह्सवर पुरेसा प्रतिसाद देते. लो लेव्हलपासून टॉर्क उपलब्ध असून पुरेशा एक्सलरेशनची खातरजमा करते, हे भारतातील ड्राइव्हिंग स्थितीकरीत आदर्श आहे. हे इंजिन कामगिरी आणि बचतीत योग्य संतुलन राखते सोबतच इंधन कार्यक्षमता चांगली ठेवते देखभाल खर्च कमी करते.

हा मंच मोड्यूलरीटी, प्रशस्त जागा, आराम आणि अभिनव असा ड्रायव्हिंग आनंद देतो
रेनो  ट्रायबरचा मॉड्युलर मंच नवीन आहे जो भारतात रेनोच्या बी-सेगमेंटमधील प्रवेशाला अधोरेखित करतो. हा मंच फायदा देऊ करतो, जो रेनो ट्रायबरला बाजारात महत्त्वपूर्ण आधार देतो:
प्रवासी कप्प्यात कमाल जागा
पुरेसा इंजिन कप्पा   
सर्वोत्तम जागा आणि अद्वितीय लवचिकता
आरामदायक आणि सर्वोच्च ड्रायव्हिंग अनुभव

सुलभ हाताळणी
रेनो ट्रायबरमध्ये रिअर पार्किंग सेन्सर आणि रिव्हर्स कॅमेरा आहे, ज्यामुळे चालकाला सुधारित दृश्यता (व्हिजिबलीटी) आणि सुलभ हाताळणी व पार्किंगचा अनुभव मिळतो.

सर्वोच्च पातळीवरील सुरक्षा

रेनो  ट्रायबरने भारतीय बाजारांसाठी सुरक्षेची सर्व ती खबरदारी घेतली आहे तसेच एक पाऊल पुढे जाऊन प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या संरक्षणाची खातरजमा ठेवली आहे. वाहनाचा मंच त्याला वेगवान तर ठेवतोच, सोबतच सर्वोच्च सुरक्षेची हमी देतो. सुरक्षेची हीच पुष्टी करत सर्वच रांगांमध्ये 3-पॉइंट बेल्ट्स देण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील साईड  सीटवर बसणाऱ्यांसाठी रेट्रॅक्टर देण्यात आले आहेत. चालकाच्या सीटवर देखील प्रीटेन्शनर आणि लोड लिमीटरची सोय आहे. रेनो ट्रायबरमध्ये 4 एअरबॅग्जची सुविधा आहे. : ड्रायव्हर, प्रवासी आणि पुढील बाजूला.

तांत्रिक वैशिष्ट्ये

लांबी
       3990 एमएम
रुंदी   
1739 एमएम (दरवाज्यावरील आरसे वगळता)
उंची      
 1643 एमएम (रूफ रेल्स वगळता)
व्हीलबेस
2636 एमएम
केर्ब वेट
947 किलो
इंजिन प्रकार
1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन
डिस्प्लेसमेंट       
999 सीसी
कॉन्फिगरेशन
3 सिलेंडर्स  
गिअरबॉक्स
5 स्पीड मानवी हाताळणी-युक्त प्रक्षेपण (मॅन्युअल ट्रान्समिशन)
शक्ती
72Ps @ 6250 RPM
टॉर्क  
96Nm @ 3500 RPM
टायरचा आकार
185/65 R15 & 165/80 R14
पुढले सस्पेन्शन  
एमसीफेरसन स्टर्ट
मागील सस्पेन्शन
टॉर्जन बीम
बूट व्हॉल्युम
84 एल (7-सीटर स्थिती)
320 एल (6-सीटर स्थिती)
625 एल (5-सीटर स्थिती)
ग्राऊंड क्लिअरन्स  (अनलेडन)
182 एमएम
इंधन टाकीची क्षमता
40 लिटर्स


रेनो बद्दल

रेनो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही  रेनो एस. ए. एस. फ्रान्सच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. रेनो  इंडिया कार्सची निर्मिती ओरागडाम, चेन्नई येथील निर्मिती सुविधा केंद्रात करण्यात येते. या प्रकल्पाची क्षमता वर्षाला 480,000 युनिट्स तयार करण्याची आहे. सध्या रेनो  इंडियाचा विस्तार देशभरातील 350 विक्री आणि 264 सेवा केंद्रांत असून त्यांनी विक्री तसेच सेवा दर्जात मापदंड प्रस्थापित केला आहे.

रेनो  इंडियाची उत्पादन श्रेणी आणि सेवांना ग्राहकांमध्ये तसेच उद्योग तज्ज्ञांमध्ये बळकट मान्यता लाभली आहे. 60 हून अधिक पुरस्कार पटकावणारा रेनो इंडिया हा वर्षभराच्या कालावधीत भारतात सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा ब्रँड ठरला. रेनो  क्विडने आधीच 32 पुरस्कार खिशात घातले आहेत, ज्यामध्ये 10 ‘कार ऑफ द इयर’ अवॉर्डस्’चा समावेश आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.