Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०३, २०१९

आता जी-मेल पाठवा शेड्युलनुसार



कोणत्याही मेलही सर्व्हिसवरून पाठवलेला मेल काही क्षणातच दुसऱ्या ई-मेल अॅड्रेसवर पोहोचतो. पण आता जी-मेलवरुन ई-मेल पाठवला तरी तो दुसऱ्या ई-मेल अॅड्रेसवर कधी पोहोचावा हे ठरवणं शक्य आहे. जी-मेलच्या १५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुगलने हे फीचर उपलब्ध करून दिलं असलं तरी याची माहिती अजून फार युजर्सपर्यंत पोहचलेली नाही. या फीचरद्वारे ई-मेल पाठवण्याची वेळ शेड्युल करता येते.

हे फीचर असे वापरा...
- ब्राउजरमधून जी-मेल उघडावे.

- अकाउंटचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे.

- नवीन ई-मेल तयार करण्यासाठी 'Compose' हा पर्याय निवडावा.

- मेसेज विंडो आल्यानंतर आवश्यक तो मजकूर लिहून ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा ई-मेल आयडी लिहावा.

- आता Send हा पर्याय निवडण्याऐवजी त्या शेजारी असलेल्या बाणासारख्या आयकॉनवर क्लिक करावे.

- Schedule Send हा पर्याय इथे उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करावे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.