Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २८, २०१८

युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा

                    वाडी नगर परीषदेवर मटका फोड आंदोलन

भीषण पाणीटंचाईच्या  विरोधात  नागरिकांचा आक्रोश
वाडी / अरूण कराळे :

येथील डॉ .आंबेडकर नगर मध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात  टंचाई निर्माण झाली असून पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेकडो महीला व पुरुष हिंगणा विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वात बुधवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता वाडी नगर परिषद वर हल्लाबोल केला . या आंदोलनाला पिपल्स रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया व भारीप बहुजन महासंघ यांनी  पाठींबा दिला होता .वाडी नगरपरिषद क्षेत्रातील डॉ .आंबेडकर नगर मध्ये  सामान्य व गोरगरीब कुटूंब राहत असून बहुतेकांचा व्यवसाय,मजुरी खाजगी काम करणे  आहे .१५ दिवसांपासून या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. आंदोलना दरम्यान नागरीकांनी लाठी काठी खायेंगे , पाणी लेके जायेंगे  अशा प्रकारचे नारे देऊन परिसर दणाणून सोडला . काही  महीला मटका घेऊन आल्या होत्या त्यांनी  प्रशासनाविरोधात मटका फोडून निषेध केला . अनेक दिवसांपासून येथील नागरीकांच्या घरी  पाणी येथे बंद झाले आहे कामधंदे सोडून पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाडी  नगर परिषद  व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या विरोधात असंतोष पसरलेला दिसून आला . या अगोदर  नगरपरिषद प्रशासनाला पाण्याच्या टंचाई बद्दल माहीती देऊनही कुठलीच उपाययोजना केली नसल्याचे आंदोलनकर्त्यचे म्हणणे होते . मुख्याध्याधिकारी राजेश भगत यांना हिंगणा विधान सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस,पिरीपाचे तालुका अध्यक्ष  कंटीराम तागडे भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा सल्लागार राजेश जंगले,कांग्रेसचे निर्मला नागपुरकर,गौतम तिरपुडे,किशोर नागपुरकर,भीमराव कांबले,अशोक गडलिंगे,वंदना कांबले,किरण पवार,सिमा कांबले,गीता उके,प्यारेलाल पवार आदींनी निवेदन देऊन समस्या निकाली काढण्याची मागणी दिली .आदोंलनादरम्यान वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला . याविषयी मुख्याधिकारी राजेश भगत यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की वाडीतील पाणी टंचाईच्या समस्येवर शुक्रवार ३० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्या सोबत  बैठक घेण्यात येईल व पाण्याच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.