Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

महावितरणचे हुडकेश्वर उप विभागीय कार्यालय सुरु

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणचे हुडकेश्वर येथे नवीन उप विभागीय कार्यालय आजपासून कार्यरत झाले असून या कार्यालयावर काँग्रेस नगर विभागाचे प्रशासकीय नियंत्रण राहणार आहे. 
या अगोदर नागपूर ग्रामीण उपविभाग असे या कार्यालयाचे नाव होते आणि नागपूर ग्रामीण-१ या विभागाचे यावर नियंत्रण होते. या उपविभागात फेटरी, बाजारगाव, हुडकेश्वर, खरबी, मानकापूर, नागपूर पूर्व, वाडी या शाखा कार्यालयांचा समावेश होता. यातील बाजारगाव शाखा कार्यालय कोंढाळी उपविभागाला जोडण्यात आले आहे. तसेच नागपूर ग्रामीण-१ हे विभागीय कार्यालय कार्यालय उमरेड येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.