Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ०२, २०१८

दारूसाठ्यास 7 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

2 आरोपींना अटक , वरोरा डी. बी.पथकाची कार्यवाही
वरोरा  प्रतिनिधी:
शहरातील नागपूर - चंद्रपूर महामार्गावर दि. 1 फेब्रुवारी रोजी नागपूर मार्गाकडून एक गाडी अवैध दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच डी. बी. पथक वरोरा ने नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील आनंदवन चौक येथे नाकाबंदी करून  गाडी क्रमांक एम. एच. 05 ए. जे. 7537 या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 2 लाख 30 हजार 400 रुपये किमतीची विदेशी दारू व चारचाकी गाडी असा एकूण 7 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपी नामे अर्पित अनिल पाटील रा. नागपूर व कडोरी महेश साहू या दोघांना अटक केली आहे. सदर कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनीत घागे व डी. बी. पथक वरोरा यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.