Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १४, २०१८

बिर्याणी खाऊ घालून नागपुरात तरुणीवर बलात्कार

नागपूर/प्रतिनिधी:   
ओळखीच्या तरुणीला (वय २५) गुंगीचे औषधयुक्त बिर्याणी खाऊ घालून आरोपी मनोज बावनेर (वय २७, रा. केजीएन सोसायटी, गिट्टीखदान) याने बलात्कार केला. त्यानंतर माफी मागण्याच्या बहाण्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला गप्प केल्यानंतर आता आरोपीने लग्नास नकार दिला.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, २ डिसेंबर २०१७ ला रात्री ८.३० च्या सुमारास तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी मनोज तिच्या घरात आला. तिला बिर्याणी आणून खाऊ असे तो म्हणाला. तिने होकार दिल्यानंतर मनोजने बाहेरून बिर्याणी आणली. ती खाल्ल्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्याअवस्थेत मनोजने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱ्या  दिवशी पुन्हा मनोज तिच्या घरी माफी मागण्याच्या बहाण्याने गेला. यावेळी ती शांत असल्याचे पाहून त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तिने पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शांत केले. त्यानंतर तो तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध जोडू लागला. ती आता गर्भवती झाली. तिने मनोजला हे सांगून तातडीने लग्न करू असे म्हटले. मात्र, आरोपीने तिला लग्नास नकार देऊन वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली.
आरोपी गजाआड
पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी मनोजला अटक करण्यात आली आहे. तो खासगी नोकरी करतो.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.