Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

रेल्वेत कटुन दोन वयोवृद्धांचा मृत्यू

चंद्रपुर /प्रतिनिधी-
एक्सप्रेसच्या रेल्वे रुळावर 2 अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली बाबुपेठ रेल्वे फाटकापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एक्सप्रेसच्या रुळावर पहाटे चार ते पाच वाजताच्या दरम्यान घडली. 2 अज्ञात वयोवृद्धांचा मृतदेह रेल्वेने  कटलेल्या अवस्थेत आढळला. त्यांचे वय जवळपास 50 व 60 वर्षे सांगण्यात येत आहे.

 सकाळी काही लोक या  रेल्वे रुळाकडे  शौचालयास जायला निघाले तेव्हा ही घटना उघडकीस आली.  या दोन मृत व्यक्तीची ओळख अजुनही पटलेली नसून  चंद्रपूर पोलीस याचा तपास  करीत आहे.  या  घटनेमुळे  हा घातपात आहे की  घटना  याचा अंदाज वृत्त लिहेपर्यंत तपास अधिकारी सांगू शकले नाही . घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस विभागामार्फत करण्यात येत असून याठिकाणी श्वान पथकाची मदत घेण्यात येत होती. मृतांच्या वेशभूषेवर ते प्लास्टिक वेचनारे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक माहिती मिळाली नसून चंद्रपूर पोलीस याचा तपास करीत आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.