Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल २४, २०१५

आमदार सुधीर पारवे यांना २ वर्षांची शिक्षा



नागपूर - उमरेडचे भाजपचे आमदार सुधीर पारवे यांना शिक्षकाला केलेली मारहाण प्रकरणी भिवापूर न्यायालयाने सुधीर पारवे यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दीड हजारांचा दंडही ठोठावला आहे

शिक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी नागपूर येथील भाजप आमदार सुधीर पारवे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली, व्हिवापूर न्यायालयाने आज(शुक्रवार) हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

जिल्हा परिषद सदस्य असताना सुधीर पारवे य़ांनी 2005 साली महेंद्र धहाडगावे या शिक्षकाला मारहाण केली असल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. व्हिवापूर न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणावर आज न्यायालयाने सुनावणी दिली. तत्कालीन भाजपचे आमदार असलेल्या सुधीर पारवे यांना दहा वर्षानंतर न्यायालयाने दोन वर्षासाठी तुरुंगात पाठवले आहे.



जिल्हा परिषदेचे सदस्य असताना शिक्षकास शाळेत जाऊन मारहाण केल्याप्रकरणी उमरेडचे विद्यमान आमदार सुधीर पारवे यांना न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि अडीच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, पारवे यांच्या वकिलांनी या निर्णयाला आव्हान दिल्याने या शिक्षेला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. 

सुधीर पारवे 2005 मध्ये कारगाव क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य होते. सेलोटी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महेंद्र धारगावे यांना शाळेत जाऊन मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी शिक्षकाने भिवापूर ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पारवे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक त्यांना करण्यात आली होती. याप्रकरणी उमरेडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील न्यायालय भिवापूर येथे स्थलांतरित झाले. तेव्हापासून या प्रकरणाची याच न्यायालयात सुनावणी सुरू होती. उमरेड विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर सुधीर पारवे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यात ते दोनदा आमदार झाले.
या प्रकरणात एकूण 20 वेळा सुनावणी झाली. त्यापैकी 2014 मध्ये 22 ऑगस्ट, 28 नोव्हेंबर व यावर्षी 10 एप्रिलला झालेल्या सुनावणीला पारवे स्वत: उपस्थित होते. पारवे यांच्या बाजूने प्रथम ऍड. गंगाधर हुंगे यांनी काम पाहिले. अंतिम सुनावणीच्या वेळी ऍड. अनिरुद्ध चौबे यांनी युक्तिवाद केला. 10 एप्रिल रोजी अंतिम युक्तिवाद झाला. ऍड. चौबे यांनी न्यायालयाचे यापूर्वीचे निकाल आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला. मात्र, निर्धारित वेळेत पुरावे सादर न झाल्याने न्यायाधीश कमल जयसिंघानी यांनी शुक्रवारी (ता. 24) दुपारी दीड वाजता निकाल घोषित केला. यात आरोपी आमदार सुधीर पारवे यांना भादंवि कलम 332 (मारहाण करणे) आणि 353 (शासकीय कामात अडथळा) अन्वये दोन वर्षांचा कारावास आणि अडीच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादी शिक्षकाच्या वतीने सरकारी वकील अनिल बिहाऊत यांनी बाजू मांडली. पारवे यांच्या वकिलांनी या निर्णयाला आव्हान दिले असून, याच न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली आहे.

प्रकरण 10 वर्षांपूर्वीचे 
कारगाव जिल्हा परिषद सर्कलमधील सेलोटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महेंद्र बारीकराव धारगावे हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शालेय पोषण आहारातील प्रकरणावरून जिल्हा परिषद सदस्य सुधीर पारवे 10 डिसेंबर 2005 रोजी शाळेत गेले. तेथे पारवे व धारगावे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पारवे यांनी शिक्षकाच्या कानशिलात हाणली. त्याची तक्रार धारगावे यांनी भिवापूर पंचायत समितीच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकारी आशा वासनिक यांच्यासह भिवापूर पोलिस ठाण्यात दाखल केली.

हा विषय जिल्हा परिषदेच्या सभांमध्येही गाजल्या. शिक्षक संघटनांनी एकत्र येताच धारगावे यांची बदली करण्याचेही प्रयत्न झाले. या प्रकरणात एकूण पाच जणांची साक्ष नोंदविण्यात आली. यात तीन विद्यार्थ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तपास अधिकाऱ्यास सुनावणीच्या वेळी गैरहजर राहण्यास प्रवृत्त केल्यावरून पारवे यांना 24 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने तब्बल 1 तास 11 मिनिटे उभे ठेवले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.