Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०२, २०१४

मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण

गडचिरोली विधानसभा क्षेत्र
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या एकूण 1408 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामकाजविषयक प्रशिक्षण आज पार पडले.

गडचिरोलीतील बसस्थानकाजवळील कारमेल विद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षण क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणाची पाहणी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी केली. यावेळी कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी आर.जी. खजांची, तहसीलदार बी. जी. जाधव, नायब तहसिलदार एस.बी. राठोड यांची उपस्थिती होती.

कारमेल विद्यालयात एकूण 36 खोल्यांमध्ये राखीव मतदान प्रतिनिधींसह एकूण ३५२ पथकातील १४०८ मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये इव्हीएम मशीन वापराबाबत संपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर मतदान केंद्रातील सुरक्षा व्यवस्था नेमून दिलेली कामे, मतदान प्रक्रिया, निवडणूक विषयक कागदपत्रे, मार्गदर्शक तत्त्वे आदींसह निवडणूक कामकाजाची माहिती देण्यात आली. निवडणूक कामकाजविषयक माहिती छापील मजकुरासह पॉवरपॉइंट आणि दृश्यस्वरूपातही प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. प्रशिक्षणासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.