Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १३, २०१३

केव्हा येणार बोंद्रे प्रकरणाचा चौकशी अहवाल

दहा दिवसांपूर्वीच नोंदविले गेले २५ जणांचे बयाण

१६ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याची शक्यता



चंद्रपूर- जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक बोंद्रे यांच्यावर एका महिला ग्रामसेविकेने शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. या आरोपाची सत्यता जाणून घेण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने तक्रारकर्त्या ग्रामसेविकेसह २५ जणांचे बयाण दहा दिवसांपूर्वीच नोंदविले. मात्र, अजूनही काही बाबींची तपासणी समिती करीत आहे. त्यामुळेच अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. दरम्यान, येत्या १६ डिसेंबरपर्यंत समिती आपला अहवाल मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडे सादर करणार असल्याची माहिती आहे.

बदलीच्या अनुषंगाने केलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप महिला ग्रामसेवकाने केला. त्याची तक्रार रामनगर पोलिसांत दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याची तक्रार दिली. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीत जलस्वराज्य प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता संगीता जयस्वाल, आरोग्यसेविका प्रतिभा नगराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गेडाम, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी, दोन वकील, शिक्षण विभागाचे मोहरे यांच्यासह अन्य काही अधिकार्‍यांचा समावेश आहे.

या चौकशी समितीने ३० नोव्हेंबरला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात विवेक बोंद्रे, महिला ग्रामसेवक यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सुमारे २५ जणांचे बयाण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात नोंदविले. ही सर्व प्रक्रिया पाहिजे तशी सरळ नाही. यामुळे अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. दोन दिवसांत संपूर्ण अहवालावर शेवटचा हात फिरविल्यानंतर समिती मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडे तो सादर करणार असल्याचे समजते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.