चंद्रपूर : सापाच्या विषाची तस्करी करणारी टोळी वन विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी अकोल्यात जेरबंद केली. वन अधिकार्यांनी सापळा रचून वरोरा येथे सुशील सिरसाट यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून
१५ मीलि विष आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे
गुरुवारी सकाळी १0 वाजताच्या दरम्यान अकोला शहरातील शिवाजी हायस्कूल जवळील संगम फोटो स्टुडिओमध्ये ही कारवाई करण्यात आली. सापाच्या विष तस्करीचे जाळे विदर्भात पसरले असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने समोर आली. सापाच्या विषाची तस्करी अकोल्यातून होत असल्याची माहिती वन विभागाचे वार्डन देवेंद्र तेलकर यांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यांनी याबाबत वन विभाग आणि वन्यजीव विभागास कळविले. या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी जाळे विणण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू होते. विष तस्करांची टोळीतील एक जन वरोरा येथे असल्याची माहिती वन विभागास मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून सुशील सिरसाट यास अटक करण्यात आली.