जिल्हाधिका-यांकडून जागा हस्तांतरीत
चंद्रपूर दि.१८- चंद्रपूर येथे प्रस्तावित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बल्लारपूर बायपास रोडवर पागलबाबा मंदिराजवळ २५ एकर जागा देण्यात आली असून नोडल अधिकारी डॉ. दीक्षित यांना जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी जागेचा अभिहस्तांतरीत आदेश आजच सूपुर्द केला.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध जागेचा ताबा घेण्यासाठी शासकीय महाविद्यालय नागपूर येथील नोडल अधिकारी डॉ.पि.जी.दीक्षित व डॉ.सतिन मेश्राम, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पि.एम.सोनुने, डॉ.ए.के.हजारे, डॉ.बंडू रामटेके यांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे व भुसंपादन अधिकारी चंद्रकांत बोरकर यांची आज भेट घेतली तसेच जागेची पहाणी केली.
प्रत्यक्ष जागेची पहाणी करुन डॉ.दीक्षित यांनी जिल्हाधिकारी वाघमारे यांचे सोबत बैठक केली. सर्वे नं.५०३/१ मधील २५ एकर जागा देण्याचा अभिहस्तांतरीत आदेश भूमिअधिग्रहन अधिकारी चंद्रकांत बोरकर यांनी तयार केला. हा आदेश नोडल अधिकारी तथा उपअधिष्ठाता डॉ.पी.जी.दीक्षित यांना सूपुर्द करण्यात आला. नवीन शासकीय महाविद्यालयासाठी गठीत करण्यात आलेल्या चमुची ही तिसरी भेट होती. या भेटीत त्यांना जागेचा ताबा देण्यात आला हे विशेष.