जिल्हा परिशदेच्या षिक्शक बदलीत अधिका-यांनी स्वतःच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी षिक्षीकेची बेकायदेषीर बदली करून बळजबरीने भारमुक्त केल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेत, या प्रकरणात मुख्य कार्यपालन अधिका-यासह संबधीतांवर नोटीस बजावल्या षिक्शण विभागात खळबळ माजली.
येत्या 20 मार्चला हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वारले यांचे न्यायालयाने हे आदेश बजावले आहे.
सौ. माधुरी अजय सिध्दावार हे या षिक्षीकेचे नांव असून, ती मूल पंचायत समिती अंतर्गत जानाळा येथे कार्यरत असतांना तीची प्रषासकीय कारणावरून सिंदेवाही पंचायत समितीत बदली करण्यात आली. समोपदेशनद्वारे बदली करतांना, सौ. माधुरी सिध्दावार हिने सरडपार चक येथील विकल्प भरून दिला. मात्र प्रत्यक्श बदली सिंदेवाही कन्या षाळेत करण्यात आली. तीथे ती रूजू होवून कार्यरत असतांनाच दोन महिण्यात मेंढा माल वरून कळमगांव तु. येथे बदली करण्यात आली. वास्तवीक मेंढा मालचा काहीही संबध नसतांना, तेथून बदलीचे चुकिचे आदेश निघाल्यांने, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी या बदलीची चैकषी सुरू केली. या प्रकरणात षिक्शण विभागातील अधिका-यांची चूक झाली असल्यांचे लक्षात येताच, त्यांनी सदरर्हु षिक्षीकेला सिंदेवाही कन्या येथेच ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र पुन्हा दोन महिण्यात समायोजनच्या नावाखाली संवर्ग विकास अधिकारी सिंदेवाही यांनी त्यांची बदली कळमगांव तु. येथे केली. सौ. माधुरी अजय सिध्दावार यांचे नंतर, त्या षाळेत दोन षिक्शक रूजू झालेत. समायोजन करतांना त्यांचेपेक्षा कनिश्ट षिक्शक असतांनाही त्यांना तेथेच कायम ठेवून सौ. माधुरी सिध्दावार यांचेच आकसाने समायोजन केले. याबाबत सौ. सिध्दावार यांनी वरिश्ठांना वारंवार वस्तुस्थिती सांगीतली असतांनाही त्यांचे विनंतीकडे दुर्लक्श करण्यात आले. दरम्यानच्या काळात गटषिक्शणाधिकारी सिंदेवाही यांनी षाळेत जावूनही संबधीत षिक्षीकेला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. अखेर या षिक्षीकेने मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करून घेत उच्च न्यायालयाने अर्जदार महिलेच्या विरोधात षिक्षीकेस बळजबरीने कोणतीही कारवाई करू नये असे आदेश पारित केले व 20 मार्चला अंतिम सुनावणीसाठी उत्तरासह हजर होण्याचे आदेश सचिव, ग्राम विकास व जलसंधारण, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यपालन अधिकारी जि. प. चंद्रपूर, षिक्शणाधिकारी (प्राथ.), संवर्ग विकास अधिकारी सिंदेवाही, गटषिक्शणाधिकारी सिंदेवाही, मुख्याध्यापक जि.प.प्राथ. कन्या षाळा सिंदेवाही यांना दिले आहे.
गटषिक्शणाधिकारी सिंदेवाही हे या प्रकरणी वरिश्ठांना चुकिची माहिती दिल्यांने यापूर्वीचे त्यांचेवर वेतनवाढ रोखण्याचे आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिल्यांचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
अर्जदार षिक्षीकेच्या वतीने अॅड. तृप्ती उदेषी, अॅड. गौरी तगलपल्लेवार यांनी काम पाहिले