उन्हाळ्यामध्ये ताडोबा अभयारण्याकडे पर्यटकांची रीघ लागते. येथील दाट झाडी असलेले जंगल, फुले व फळांचे विविध प्रकार, अनेक जातींचे पक्षी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील वाघ हे पर्यटकांचे आकर्षण. मात्र, ताडोबाचे जंगल, वाघ, तेथील आदिवासी व वनाधिकारी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. अभयारण्यातील या प्रत्येक घटकाच्या आजच्या स्थितीचा व भवितव्याचा हा आढावा... वनरक्षकांच्या समस्याही महत्त्वाच्या!वनरक्षकांच्या प्रयत्नांमुळे जंगलातील वाघ सुरक्षित. जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रणासाठी प्रयत्न. शिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवल्याने वाघांचे संरक्षण. आदिवासींना कायदा समजावून सांगत जंगलाचे रक्षण करण्याचा प्रयत्न. साधनसामग्री अपुरीसंरक्षणास पुरेसे कर्मचारी नाहीत. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा अनुशेष. अंतर्गत भागात काम करण्यास चांगल्या अधिकाऱ्यांची तयारी नाही. अभयारण्यात राहण्यास वन कर्मचारी धजावत नाहीत. या कर्मचाऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न. गस्ती पथके पुरेशी नाहीत. ताडोबातील जखमी वन्य जीवांवर उपचारासाठी सोय नाही. पशुवैद्यकीय अधिकारी नाही. वेळप्रसंगी हिंस्र जनावरांना बेशुद्ध करून ताब्यात घेण्यासाठी "टर्नाक्युलायझर' नाही. ताडोबा व्यवस्थापनाकडे वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. काय करायला पाहिजे?वनरक्षकांना अधिक अधिकार.त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सोयी. वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठीची अद्ययावत यंत्रणा. गस्ती पथकांच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ. वाघ वाचला, तरच...२००७च्या प्रगणनेनुसार ४३ पट्टेदार वाघ, २२ बिबटे. वाघांच्या वाढीसाठी बांबूचे वन उपयुक्त. त्यामुळे त्यांची संख्या टिकून. जंगलामध्ये मोठे चढ-उतार नसल्याने वाघ सहज दृष्टीस पडतात व हेच पर्यटकांचे आकर्षण. ... पण शिकार येते मुळावरवाघांच्या संख्येच्या मानाने खाद्याचे प्रमाण कमी. शिकारीमुळे तृणभक्षक जनावरांची संख्या कमी होत आहे. याचा थेट परिणाम वाघांवर. जंगलातील नैसर्गिक जलसाठे कोरडे पडल्यावर शिकार आणि पाण्यासाठी वाघ मानवी वस्तीकडे येतात. पाणवठ्यांवर अधिकार गाजविण्याच्या प्रयत्नात मानव आणि वाघांचा संघर्ष. अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, त्या काळात वाघ पाण्यासाठी कोठे येऊ शकतात, याचा शिकारी टोळ्यांना अंदाज. त्यामुळे शिकारींत वाढ. काय करायला पाहिजे?शिकाऱ्यांपासून वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न. वर्षभर पाणी मिळण्यासाठी पाणवठे वाढविणे. मनुष्याचा हस्तक्षेप होणार नाही यासाठी प्रयत्न. जंगलाला दृष्ट लागतेय...प्राणी वैज्ञानिकांना, वन्य जीव अभ्यासकांना, तसेच हौशी पर्यटकांनादेखील ताडोबा अभयारण्याचे आकर्षण. भारतीय वन कायदा ७ अन्वये, फेब्रुवारी १८७९पासून "संरक्षित वन'. १९९५पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता. अभयारण्याची व्याप्ती ५७८.५१ चौरस किलोमीटर (११६.५५ वर्ग किलोमीटर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि ४६१.९६ वर्ग किलोमीटर अंधारी वन्य जीव अभयारण्य) वन्य प्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी कोलसा येथील तलावाखेरीज १० तलाव. उच्च दर्जाच्या बांबूची पैदास. स्थानिक आदिवासींच्या मते, "तारू' नावाचा त्यांचा पूर्वज येथे वाघाशी लढताना मारला गेला. त्याच्या स्मरणार्थ या भागाचे नाव ताडोबा. अभयारण्यातील नैसर्गिक जलाशयाच्या काठावर "तारू'चे मंदिर. कशामुळे?सध्या उपलब्ध क्षेत्र वन्य जीव व वाघांसाठी पुरेसे नाही. मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्य जीव असताना पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकलेले नाही. बांबू तस्करीत वाढ. त्यामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात. पर्यटकांसाठी सोयींचा अभाव. तीव्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता मर्यादित. काय करायला हवे?वन्य प्राण्यांच्या वावरासाठीची जागा वाढविणे. जंगल वाढण्यासाठी प्रयत्न. जंगलांना वणवे लागू नयेत यासाठी योजना. बांबूची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न. जलसाठा वाढविण्यासाठी योजना. मूळ रहिवाशांवर अन्याय का?ताडोबातील मूळ रहिवासी असल्याने जंगलावर अधिकार. पैसा ही गरज नाही, तर शिकार करून मांस खाणे ही नैसर्गिक गरज. जंगलावर प्रेम असल्याने जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न. जंगलावर आयुष्य अवलंबून असल्याने त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न. वन विभागाशीच वादाचे प्रसंग१९९६मध्ये संरक्षित क्षेत्र घोषित झाल्याने आदिवासींना जंगलापासून दूर व्हावे लागले. काम मागण्यासाठी गेलेल्या आदिवासींचे व्यावसायिकांकडून शोषण. शाळा, वीजपुरवठा, रस्ते व पाण्यापासून वंचित. रानमेवा मिळविण्यासाठी आदिवासी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे बांबू व तृणभक्षक जनावरांसाठी आवश्यक झाडांची राखरांगोळी. जंगलाला लागलेल्या आगींचा परिणाम तृणभक्षकांच्या वाढीवर व वाघांच्या संख्येवर. ताडोबा अभयारण्य झाल्यानंतर परिसरातील आदिवासी आणि वन विभागाचा संघर्षात वाढ. रानडुकरे व नीलगाईंमुळे पिकांचे नुकसान. वनहक्क कायद्यानुसार आदिवासी आपल्या अधिकारांचा वापर करतात, तर याच कायद्याचा आधार घेऊन त्यांच्या नावाने इतरांकडून वनांचे नुकसान.याचा त्रास आदिवासींना. त्यामुळे आदिवासींमध्ये वन विभागाप्रती नेहमीच असंतोष. रानमेव्यातून मिळणारी खनिजे कमी झाल्याने आदिवासींचे कुपोषण. काय करायला पाहिजे?आदिवासींच्या प्रगतीसाठी जंगलातील संपत्तीमध्ये त्यांना भागीदार करवून घेणे गरजेचे. विस्थापित आदिवासींच्या प्राथमिक गरजा शासनाने पूर्ण कराव्यात. जंगलातील संपत्तीवर आदिवासींचा हक्क हवा. अभयारण्यासंदर्भातील कायद्यांची योग्य माहिती त्यांना द्यावी. जनावरांमुळे पिकांची हानी झाल्यास त्वरित भरपाई मिळावी. रानमेवा मिळणे अशक्य झाल्याने त्यांच्या पोषणासाठी सरकारने प्रयत्न करावेत. पर्यटकांसाठी गाइड म्हणून काम करणे, वनातील फुले, फळे व मधासारख्या गोष्टी विकण्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे. पर्यटक तर यायलाच हवेत..सोयी, गैरसोयी अभयारण्यामध्ये चढ-उतार नसल्याने वाघांना पाहणे सोपे. ताडोबाचा प्रमुख जलाशय पक्षिनिरीक्षकांचे आवडते ठिकाण. संपूर्ण जलाशयाला परिक्रमा करता येईल, असा जीपने प्रवासयोग्य मार्ग. ताडोबापासून १८ किलोमीटरवर असलेल्या मोहर्ली येथे काही खासगी रिसॉर्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राहण्याची व्यवस्था. "मगर प्रजनन केंद्रा'तून सोडलेल्या मगरी काठावर पहुडलेल्या पाहायला मिळतात. ताडोबाच्या आतील पर्यटकांसाठी असलेले रिसॉर्ट व्याघ्रसंरक्षणासाठी आता बाहेर. खासगी रिसॉर्ट सामान्य पर्यटकांना परवडत नाही. चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून ताडोबाचे अंतर ४५ किलोमीटर. ताडोबाला जाण्यासाठी वन विभागातर्फे सोय नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस. त्यांच्या वेळा सकाळी आणि सायंकाळी. (ताडोबामध्ये पर्यटकांना सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ या वेळात प्रवेश.) खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट. ताडोबाच्या पर्यटकांसाठी सुरू केलेली डेक्कन ओडीसी ही रेल्वेसुद्धा सेवाग्रामपर्यंतच. ताडोबाच्या आत पर्यटकांना फिरविण्यासाठी खासगी वाहने आहेत; मात्र त्यांचेही दर ठरलेले नाहीत. व्यवस्थापनाने सर्वसामान्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वाहतूक आणि राहण्याचा प्रश्न प्रथम सोडविण्याची गरज. बस आणि रेल्वे स्थानकांवरून पर्यटकांना ताडोबाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचविण्याची व्यवस्था नाही. ... पण, हे तारतम्यही हवेजंगलातील झाडे व फुलांना बाधा पोचवू नये. वन्य प्राणी बिथरतील असे वर्तन करू नये. मोठ्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आदिवासींच्या सहवासात राहिल्यास त्यांना रोजगार मिळेल. अभयारण्यामध्ये प्लास्टिकचा कचरा करू नये. प्रश्न बफर झोनचा ताडोबा अभयारण्य वाचविण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर झोनभोवती बफर झोन प्रस्तावित. हे ११०१.७७ चौ.कि.मी क्षेत्र राखीव. यात ७९ गावांचा समावेश. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रस्तावित क्षेत्रात मोठी खनिजसंपत्ती. या खाणी झाल्यास त्याचा परिणाम सरळ व्याघ्रप्रकल्पावर. बफर झोन झाल्यास वन्य जीव सुरक्षित. संकलन : प्रमोद काकडे | |
प्रतिक्रिया On 4/25/2010 10:48 AM Ashutosh Joshi said: अतिशय उत्तम आणि मुद्देसीद लेख आहे. फक्त खाणकामाचा मुद्दा फारच गंभीर असल्याने तो अजून थोडा ठळक पाने मांडला गेला असता तर अधिक चांगले झाले असते असं मला वाटते. पण माझी सरकार आणि निधी देणाऱ्या कंपन्यांना आणि सर्वांनाच विनंती आहे कि अशी प्रक्टीकॅल संवर्धन करणाऱ्या लोकांना तुमचे निधी जाऊ द्यात. तरच वाघ वाचतील. On 4/22/2010 10:36 AM Jitendra Kulkarni said: धन्यवाद प्रमोद... अतिशय माहितीपूर्ण आणि मुद्देसूद लेख आहे. मी ताडोब्याला गेली २५ वर्षे जात आहे आणि लेखातील सगळेच मुद्दे तेव्हापासून पाहत आहे. कदाचित त्याच्या हि आधी पासून ते तसेच असतील. माझा इ मेल सोबत दिला आहे. जर काही योजना ताडोब्या साठी आखली जात असेल तर कृपया संपर्क करणे हि विनंती. On 4/22/2010 9:54 AM Dr.Manoj Prabhavat said: थान्क्स प्रमोद ! हा लेख वाचून ताडोबा प्रकल्पाची पूर्ण कल्पना आली ! खरच वाघांना वाचावाय्साठी खूप काही करायचं आहे आणि मला वाटत कि सरकार ने ह्या बाबत लवकरच काही तरी उपाय करायला पाहिजेत. On 4/22/2010 9:15 AM Bhagyesh Jain said: धन्यवाद ! प्रमोद, यासाठी काही योजना आखल्या गेल्यास, आमच्यासारखी सर्व तरुण मंडळी या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. On 22/04/2010 08:57 प्रशांत said: वरील सुचविलेल्या उपायांपैकी काही उपाय सोपे आहेत कमीतकमी ते तरी पूर्ण व्हावेत एवढी सरकार कडून अपेक्षा आहे. मागील अंकात जंगल तोडी बद्दल ऐकून फार वाईट वाटले होते. मिझी सरकारला विनंती आहे कि माणसांची नाही तर कमीतकमी जंगली प्राण्यांची तरी काळजी घ्या. काही तरी निर्णय (दिल्लीला विचारून नाही) घ्या. On 4/22/2010 8:14 AM Rupesh Pansare said: खूप छान प्रोजेक्ट. सरकारने याकडे लक्ष्य द्यायला हवे.... धन्यवाद प्रमोद. On 4/22/2010 5:26 AM atul kumthekar said: ताडोबा प्रकल्प पुण्यात आणावा ! मग बिल्डर्स हळू हळू त्याचे कोन्क्रेतिज़तिओन करतील आणि पर फमिली एक वाघ पाळलाच पाहिजे असा नियम राष्ट्रवादी सरकार करेल ! On 4/22/2010 4:50 AM sandeep said: धन्यवाद ! मुद्देसूद लेख वाचून लवकर व प्रखरपणे समजले. On 4/22/2010 1:34 AM satish patil said: केंद्रीय पर्यावरण मंत्र्याच्या पासून , झाड तोडणार्या गुन्हेगारापर्यंत ची भ्रष्टाचाराची लिंक नष्ट केली तरच भारतातले झाड वने विसरा झाड वाचेल . व्याघ्रप्रकल्प वागिरे लांबच्या गप्पा आहेत . |
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments