Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वीर शिवा काशिद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वीर शिवा काशिद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जुलै १३, २०२०

🔹वीर शिवा काशिद🔸

🔹वीर शिवा काशिद🔸

*_⭕ शिवा काशिद म्हणाला, सोंगातला शिवाजी असलो म्हणून काय झालं. तो काय पालथा पडल.  ⭕_*



'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*_🌷 तारीख  १३ जुलै २०२०  🌷_*
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*आदिलशाही सरदार सिद्धी जौहरच्या वेढ्याची मगरमिठी पन्हाळगडा भोवती पडली होती.* स्वराज्याचं हृदय शिवबा त्यात गेल्या काही महिन्यांपासून अडकला होता. सिद्धी जौहर सोबत आदिलशाह ने अनेक नामांकित सरदार आणि १५००० चं सैन्य दिलं होतं. तिथून बाहेर पडणं निव्वळ अशक्य बनलं होतं. स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर बाहेरून वेढ्यावर हल्ले चढवत होते पण सिद्धी दाद देत नव्हता.
बघता बघता पावसाळा आला. जसे दिवस वाढतील तसे अख्खा महाराष्ट्र राजांच्या काळजीने खचत चालला होता.
त्यादिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. ढगांच्या गडगडासह निसर्गाचं रुद्र तांडव सुरु होतं. वातावरण महाराजांसाठी अनुकूल झाल होतं. त्यांनी निर्णय घेतला आज काहीही करून वेढा भेदायचा. विशाळगडाकडे प्रस्थान करण्याची सगळी तयारी झाली. राजे येताच बांदलांचे सहाशे मावळे उठले. बाजीप्रभू सोबत असणार होते
महाराजांना भर पावसात पालखीतून पळवीत पळवीत न्यायच ठरल होत. महाराज पालखीत बसले! मोठी जोखीम होती. गडावर हजर असणाऱ्या प्रत्येकाच काळीज धडधडत होत. भोयांनी पालखी उचलली. पाठोपाठ बाकीचे मावळे ही निघाले. पालखी आल्यावर राजदिंडी उघडली गेली. शिवाजीराजे तटाबाहेर पडले. जाताना किल्लेदाराला सांगितलं ,
*📍“गड सांभाळा ! येतो आम्ही ! जगदंबे ! उदयोस्तु !”*
वाटाडे हेर सगळ्यात पुढे पळत होते. पाठोपाठ सर्वजण अंधार पोखरत चिखल तुडवत विलक्षण वेगाने निघाले होते . बहिर्जींच्या हेरांनी शोधलेला हा चोर रस्तामार्ग विलक्षण दुर्गम होता. मोठमोठ्या शिळा सगळीकडे पडलेल्या होत्या. जागोजागी पर्वताचे कडे तुटलेले होते. त्यावरून कोसळणाऱ्या नद्या गर्जना करीत वाटेवरून धावत होत्या. ढोपरभर चिखलात पाय रुतत होते. त्यात शेवाळामुळे निसरडेपणा आला होता. ही वाट हेरांनी निवडली. कारण हाच भाग निर्मनुष्य होता
रात्र वैऱ्याची होती. रातकिड्यांनी कर्कश सूर धरला होता. सारे वातावरण भयाण होते. निम्मा डोंगर वादळाशी झगंडत संपला. पायथा जवळ येत होता. शेवटची हद्द नजीक येत चालली. अंतर थोडे उरले होते. शंभर पावले..साठ.. चाळीस..दहा..पाच..गेला..वेढा लागला अन मागे पडला ! चला निसटलो ! पालखी झपाझप पळत होती.
*📍वेढ्याची हद्द संपली पण भय संपले नाही. आता विशाळगडाच्या रोखाने पावले धावत होती. आणखी बरेच अंतर काटले गेले, पालखी पुढेपुढे धावतच होती.*
राजे कुंभारवाडीच्या दरीजवळ आले. दरी शांत होती. त्यातून जावयाचे होते. फक्त एवढा मार्ग संपला की राजे संकटाच्या बाहेर जाणार होते. सारे हळूहळू दरीवरून पुढे सरकत होते. तोच दूरवरून आवाज आला.
*📍“होशियार ! कौन है ?”*
दगा दिसत असल्याची जाणीव झाली. मराठ्यांनी चपळाईने पाय उचलून ती दरी कशीबशी पार केलीआपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, एक क्षण गेला आणि मावळे थांबले. परत भराभर पालखी विशाळगडकडे निघाली. अखेर मांडलोईवाडी आणि करपेवाडी या मधील जंगलात महाराजांची पालखी सिद्धीच्या सैनिकांनी घेरली. थोडी चकमक उडाली. परंतु महाराज व त्यांचे मावळे पालखीसह पकडले गेले.
पालखीमध्ये शिवाजी महाराजांस पाहताच, त्या गनिम सैनिकांना दसरा-दिवाळीचा आनंद झाला. पालखी वेगाने दौडवत व आनंदाने “दीन, दीन” अशा आरोळ्या ठोकीत पन्हाळगडाचे पूर्व भागात, सिद्दी जौहराचे शामियान्यात आणली गेली. ही बातमी ऐकून सिद्दी जौहर प्रसन्नपणे हसला ! शिवाजीची पालखी पकडली, शिवाजी गिरफ्तार झाला. अशी बातमी सर्व छावणीभर पसरली व आनंदाची एक लाटच छावणीभर उसळून गेली.
_पालखीतील शिवाजी तोऱ्यात जौहरच्या छावणीत आला. थोड्याच वेळात जाणकारांना जाणवलं काही तरी गडबड आहे. सिध्दीने उलटतपासणी केली. तेव्हा कळाले हा तर तोतया शिवाजी आहे._
झालं काय होतं जेव्हा सिद्धीच्या सैनिकांना महाराज गडावरून निसटल्याची शंका आली तेव्हा मावळ्यांच्या टोळीतला  शिवा न्हावी उर्फ शिवा काशीद अगदी महाराजांप्रमाणे पोशाख करून एका पालखीत बसला. त्याच्या पालखीबरोबर पंधरावीस मावळे राहिले. शिवाची ही नवी पालखी सरळ नेहमीच्या मार्गाने चालू लागली आणि खुद्द शिवाजी महाराजांची पालखी मोठ्या टोळीसह आडरानात घुसली.
सिद्धी जौहरच्या सैनिकांनी शिवाजी समजून शिवा काशीदला पकडले होते. आणि महाराज तिकडे विशाळगडाकडे सुखरूप मार्गक्रमण करत होते.
ही तर भयंकर नामुष्कीची बाब ! अक्षरशः आदिलशहाच्या मोठमोठ्या खानसाहेब सरदारांना आणि सिद्दी जौहरला मराठ्यांनी उल्लू बनवले होते. सिद्धीने त्याला मरणाचे भय वाटत नाही का विचारले. तेव्हा तो म्हणाला,
*📍“महाराजांसाठी एकदाच काय हजार वेळा मरायला तयार आहे.”*
हे ऐकून छावणीत जमलेल्या प्रत्येकाचा जळफळाट झाला. सिद्धीच्या रागाचा पारा एकदम वाढला. खामोश ! कंबख्त ! तो  जोराने ओरडला. अन त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छताडात आरपार भोकसली ! तलवारीचे पाते रक्ताने न्हाले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटली. जखमेची जागा त्याने डाव्या हाताने दाबून धरली. उजव्या हाताने डेऱ्याचा खांब पकडला.
*📍” मी सोंगातला शिवाजी झालो म्हणून काय झालं ? तो काय पालथा पडेल ? ‘राजेss ! मुजरा ! त्रिवार मुजरा !!”*
शिवा उजव्या खांबाच्या आधाराने एकदम खाली घरंगळलाss !
शिवा काशीदच बलिदान वाया गेलं नाही. रागाच्या भरात सिद्धी जौहरने सिद्धी मसूदला मोठं सैन्य घेऊन महाराजांच्या मागावर धाडलं पण घोडखिंडीत त्याची वाट पाहत असलेल्या बाजी प्रभूंनी महाराज गडावर सुखरूप पोहचेपर्यँत त्याला पुढे जाऊ दिले नाही. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या रक्ताने घोड खिंड पावन झाली. तिची ओळखच पावन खिंड अशी झाली.
हुबेहूब छत्रपती शिवाजी राजांसारखा दिसणारे वीर शिवा काशीद हे  मूळचा पन्हाळगडाच्या पूर्वेला एका मैलावर असलेल्या नेवापुर गावचे रहिवासी. त्यांची समाधी पन्हाळगडाला लागूनच आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे हे सगळ्या मराठी मनाचं सूत्र होतं. अशा या पराक्रमी मावळ्यांमुळे स्वराज्य टिकू शकलं वाढू शकलं.
बोलभिडु वरून साभार 
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💞 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💞_*  *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''*