Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, फेब्रुवारी २४, २०२१

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेसाठी अर्ज कसा कराल?

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेसाठी अर्ज कसा कराल?

 शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेसाठी अर्ज कसा कराल ? 


3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारनं 'शरद पवार ग्रामसमृद्धी' योजना आणली आहे. या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी, गाय-म्हैस पालनासाठी शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे.
    🌀 योजनेचे @ स्वरूप 🌀
या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे.
⌨️ गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणं
यामध्ये त 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे.
6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
⌨️ शेळीपालनासाठी शेड बांधणं
10 शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरता तिप्पट अनुदान दिलं जाणार आहे.
पण, अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
⌨️ कुक्कुटपालनासाठी शेड बांधणं
100 पक्ष्यांकरता शेड बांधायचं असेल तर 49, 760 अनुदान दिलं जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दोनपट निधी दिला जाणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेसाठी अर्ज कसा कराल?

पण, समजा एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांसह शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर यंत्रणेनं शेड मंजूर करावं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणं बंधनकारक राहिल.
⌨️  भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
आता या चारही कामांमधील बांधकामासाठी लांबी, रुंदी जमिनीचं क्षेत्रफळ किती असावं याची माहिती शासन निर्णयात सविस्तर दिली आहे.,एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. पण, तुमच्याकडे मनरेगाचं जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
   ♨️ अर्ज कुठे व कसा करायचा ♨️
तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
अर्जावर अर्जदाराचं नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे. आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यानं नाडेप कंपोस्टिंग, गाय म्हैस गोठ्यांचं कॉंक्रीटिकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवं त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे.
तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडायचा आहे. यात अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचीत जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे. तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडायचा आहे.
लाभार्थ्यांच्या नावे जमीन आहे का, असल्यास हो म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे.
लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्यास रहिवासी दाखला जोडायचा आहे. तसंच तुम्ही निवडलेलं काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, ते सांगायचं आहे.

अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षावरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहायची आहे.शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
सोबत मनरेंगाचं जॉब कार्ड, 8-अ, सातबारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडायचा आहे.

यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचं एक शिफारस पत्र द्यावं लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचं सांगितलं जाईल.
त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केलं जाईल.
🔹‼️🔹‼️🔹‼️🔹‼️🔹

गुरुवार, मे १०, २०१८

ग्रामस्वराज्य अभियानः सौभाग्य योजना

ग्रामस्वराज्य अभियानः सौभाग्य योजना

 कुठे, मावळली अंधाराची भिती अन् मिळाळे प्रगतीच्या 
प्रकाषकिरणांनी भरारी घेण्यास बळ 
  कुठे उगवली ..आयुश्याच्या संध्याकाळी सोनेरी पहाट 
सौभाग्य योजना महावितरण साठी इमेज परिणाम  चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी:
    केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून सौभाग्य योजनेतून चंद्रपूर परिमंडळातील 15 गावात एकंदरीत   100 टक्के विद्युतीकरण करण्यात आले. या अभियानांतर्गत  चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील एकंदरीत 1903 कुटूुंबाना चंद्र, सुर्य, कंदील, दिवाबत्तीच्या प्रकाशानंतर आता महावितरणच्या वीजेचा प्रकाष अनुभवायला मिळाला आहे. 
     एकीकडे शहरातील जीवन, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरतांना, विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत असतांना, अनेक सेायीसुविधांचा लाभ घेत असतांना वीजेसारख्या प्राथमिक गरजेशिवाय हि कुटूंबे अनेक वर्षे धारात जीवन जगत होती.  14 एप्रिल 2018 ते 30 एप्रिल 2018 या  दोन आठवडयात महावितरणने चंद्रपूर परिमंडळाने या 1903 कुटंूंबाना प्रकाश देत त्यांची थी प्राथमिक गरज पूर्ण केली व त्यांना प्रकाशाची वाट उपलब्ध करून दिली.  
     गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्हयातील मुलचेरा तालुक्यातील- अडपल्ली येथे 70 अहेरी तालुक्यातील महागाव येथे 83, छल्लेवाडा येथे 264, चेरपल्ली येथे 71, गोविंदगाव येथे 76, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा 257 जाफराबाद येथे 164 व गुमलकोंडा येथे 174   अशा 8गावातील 1156 कुटूंबात तर,  चंद्रपूर जिल्हयातील - जिवती तालुक्यातील येल्लापूर 142, गुडसेल्ला येथे 155 व कुंभेझरी 337, चिमूर तालुक्यातील वडसी 52,  ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे 17, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे  34 व गेांडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे 7 अशा 7 गावातील 744 कुटूुंबाना चंद्र, सुर्य, कंदील, दिवाबत्तीच्या प्रकाशानंतर महावितरणच्या वीजेच्या प्रकाशाने स्वयंपूर्ण झाली आहेत.
    गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव मध्ये राहणारे गजानन फुलझेले व त्यांची पत्नी अंधारात जीवन जगात असतांना त्यांच्या जीवनातील काळोख संपुष्टात आला, तर, जिवती तालुक्यातील विष्वनाथ भालेराव या जिवती तालुक्यातील वयोवृध्द कुटंबाच्या जीवनात प्रकाष पोहोचला. आयुष्याच्या संध्याकाळी या दाम्पत्याच्या जीवनात  प्रकाशाची पहाट उगवली ,चिमूर तालुक्यातील वडसी येथिल केमा जांभुळे यांच्या जीवनात ग्रामस्वाराज्य अभियानान प्रकाशाचा सुर्य आणला. विस्तारी कंटीवार, व त्यांची पत्नी हे मोलमजुरी करून जगणारे चेरपिल्लीतील कुटूंब आता वीज आल्याने प्रफुल्लीत झाले आहे. 
 जिवती तालुक्यातील कुम्भेझरी  येथिल गणपती हरगिले यांच्याही जीवनात आलेल्या प्रकाषाने महत्वाची भुमिका बजावली आहे घरी वीज नसतांना घरातील दिव्यांग बालकांस अंधारात वावरने कठीण होते. प्रकाशामुळे आता त्यांच्या जीवनात उमेदीची नवी किरणे डोकावली आहे.
 गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथिल साजन तुलशिमानकर व त्यांची पत्नी मोलमजूरी करून जगतांना वीजेची गरज पूर्ण झाल्याने समाधानी आहेत तर जिवती तालुक्यातील येल्लापूर बालाजी बन्सोड आता मुलाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधानी आहेत.
   सरला राजन्ना अंगूरवार व त्यांच्या दोन लहानग्या- शिवानी ६ वर्षे  व अंजली;5 वर्ष  व लहानगा कार्तिकसाठी;3वर्ष आता वीज आल्याने अंधाराची भिती मावळली असून प्रगतीची प्रकाशकिरणे उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंख्याना बळ देत आहे.    महावितरणने ग्रामस्वाराज्य अभियानाच्या माध्यमातून कुठे नवीन पंखांना बळ मिळत आहे, तर कुठे जीवनातील अंधार संपूर्ण  जीवनचित्रात नवे उमेदीचे, स्वप्नांचे रंग  फुलत आहेत. या योजनेमुळे, गजानन फुलझेले, विष्वनाथ भालेराव, केमा जांभुळे,या सारख्या वयोवृध्द नागरीकांनी संपूर्ण जीवन वीजेषिवाय जगल्यांनतर आता त्यंाच्या जीवनाच्या सायंकाळी प्रकाषाची नवी पहाट उगवली आहे. 

मंगळवार, एप्रिल १७, २०१८

चित्रिकरणासाठीच्या परवानग्या आता एक खिडकी योजनेतून

चित्रिकरणासाठीच्या परवानग्या आता एक खिडकी योजनेतून

फिल्म शूटिंग परवानगी साठी इमेज परिणाममुंबई/ऑनलाईन काव्यशिल्प: चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट व माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध शासकीय परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यापुरती राबविण्यात येणार असून त्यानंतर त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.
राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. त्यांच्या चित्रिकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी (Ease of doing business) चित्रिकरणासाठीच्या परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे निर्मात्यांना शासकीय स्थळावरील चित्रिकरणासाठी लागणाऱ्या परवानग्यांबाबतचा निर्णय पंधरा दिवसांच्या आत कळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सनियंत्रक राहणार असून ही योजना सेवा हमी कायद्यांतर्गत देखील आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या १४ विभागांतर्गत येणाऱ्या स्थळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

निर्मात्यांनी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व अटी-शर्तींच्या पूर्ततेबरोबरच शुल्काचा भरणा केल्यास चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या स्थळाबाबतच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर सनियंत्रक संस्था संबंधित शासकीय यंत्रणेकडून परवानगी घेईल. संबंधित यंत्रणेने कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांत कोणताही प्रतिसाद दिला नाही तर चित्रिकरणास हरकत नाही असे ठरवून परवानगी देण्यात येईल. यामध्ये कोणत्याही संस्थेला इतर कोणत्याही संस्थेच्या ना हरकत अथवा परवानगीची आवश्यकता भासणार नाही. सर्व यंत्रणांशी समन्वय साधूनच सनियंत्रक संस्थेमार्फत अंतिम परवानगी दिली जाणार आहे. चित्रिकरणासाठी एकदा परवानगी दिल्यानंतर त्या स्थळाबाबतचे आरक्षण रद्द करता येणार नाही किंवा त्याबाबतचे शुल्क परत केले जाणार नाही. मात्र, परवानगी मिळण्यापूर्वी अर्ज रद्द केला तर प्रक्रिया शुल्क वगळून उर्वरित रक्कम परत केली जाईल. यासाठी www.maharashtrafilmcell.com हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.
mantralay साठी इमेज परिणाम