Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बीड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बीड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ऑगस्ट १४, २०२२

Accident News |  "या" कारमधील सहा जण जागीच ठार । जीवाचीवाडी व कुटे कुटुंबियांवर शोककळा

Accident News | "या" कारमधील सहा जण जागीच ठार । जीवाचीवाडी व कुटे कुटुंबियांवर शोककळा

Maharashtra News

बीड (Beed) । येथील पाटोदा- मांजरसुबा महामार्गावर बामदळे वस्तीवर १४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता कार व टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात कारमधील सहा जण जागीच ठार झाले. लग्नसोहळ्यासाठी हे कुटुंब पुण्याला निघाले होते. मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.

विनायक मेटे यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक

जीवाचीवाडी (ता. केज) येथील रामहरी चिंतामण कुटे यांचे कुटुंबीय लग्नसोहळ्यासाठी (wedding ceremony) पुण्याला जात होते. बामदळे वस्तीवर टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. यात सहा जण ठार झाले आहे.टेम्पोच्या खाली  कार घुसली होती ती काढण्यासाठी  क्रेनची मदत घ्यावी लागली. मृतांत दोन लहानग्यांचा समावेश आहे. 

Chandrapur Breaking News: बेलोरोचा स्टेरिंग तुटला; 4 ठार

घटनास्थळी पाटोदा ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार (Dr. Ramchandra Pawar) व सहकाऱ्यांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. या घटनेने लग्नसोहळा व जीवाचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

शुक्रवार, नोव्हेंबर ३०, २०१८

परळीत गाडीच्या काचा फोडून पावणेतीन लाखाची बॅग लंपास

परळीत गाडीच्या काचा फोडून पावणेतीन लाखाची बॅग लंपास

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
परळी ,शहरातील देशमुखपार भागात  उभ्या केलेल्या स्कार्पिओ गाडीच्या डाव्या बाजूच्या काचा फोडून गाडीत ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने  चोरून नेली  ही घटना दि 27 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली , या बॅग मध्ये पावणे तीन लाख रुपयाची रोकड होती तसेच बँकेचे चेक बुक होते.
                                                                                                    या चोरी प्रकरणी संजय किसनराव देशमुख यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या प्रकरणाचा तपास परळी  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे ते करीत आहेत.                                                                               परळीत गेल्या काही महिन्यात बॅग चोरी च्या घटना वाढल्या आहेत, आंबाजोगाईरोडवर घडलेल्या बॅग चोरीचा तपास अद्याप लागला नाही.  या शिवाय इतर बॅग चोरी घटनेचा तपास लागला नाही.