Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

ऎतिहासिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऎतिहासिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, मे २३, २०२१

पावनखिंडीतील घनघोर लढाई

पावनखिंडीतील घनघोर लढाई

पावनखिंडीतील घनघोर लढाई 
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
__________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3yyEXdd
छ.शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते.
ही लढाई जुलै १३,१६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीराजेंचच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू झाला.
जेव्हा शिवाजी महाराज  व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजीं महाराजाना विनंती वजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील.

पार्श्वभूमी
शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील भल्या भल्या सेनापतींना पराभवाची चव चाखायला लावली.अफझखाना सारख्या मोठ्या सेनापतीचा वध केला. या सर्वांचा परिणाम म्हणून आदिलशाहीने विजापूरहून सिद्दी जौहरला सर्व शक्तीनीशी शिवाजीं महाराजावर हल्ला करण्यास सांगितले. तसेच त्यावेळेस आदिलशाहीने मुघलांशी संगनमत करून शिवाजीं महाराजावर आक्रमण करण्यास विनंती केली. सिद्दी जौहरने शिवाजीं महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते.अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला.
आदिलशाही फौजेचे नेतृत्त्व सिद्दी जौहर कडे होते, त्यालासिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १०,००० ची होती तर शिवाजीं महाराजांचे फ़क्त ३०० ते ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री शिवाजीं महाराजानी पोर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली.शिवाजीं महाराजानी आपल्या सारख्याच दिसणाऱ्या शिवा काशिद नावाच्या नाव्ह्याला शिवाजी महाराज म्हणून जौहरकडे बोलणींसाठी पाठवले. व जौहरला चकवा दिला.इकडे शिवा काशिद जौहरला भेटायला गेले व तिकडे छ शिवाजी महाराज निसटले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले आहेत.असे सुगावा लागला तेव्हा सिद्दी मसूदला शिवाजीं महाराजांच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने शिवाजी महाराज  व साथिदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव झाली व काही वेळातच ते गाठतील व शिवाजीं महाराजाना व इतरांना पकडतील असा अंदाज होता.
घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूने शिवाजीं महाराजांना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंती वजा आदेश दिला व जो पर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.
खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अश्या प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपापल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधाऱ्यांना लढाई यावर चढून बाजीप्रभूवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाले तरी त्याने सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा गजर ऎकल्या नंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला.मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
इकडे शिवाजीं महाराजानी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.
लढाई नंतर बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले. शिवाजीं महाराजानी या लढाईत बलिदान देणाऱ्यांचे यथोचित सत्कार केले. स्वत: बाजी प्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत समावण्यात आले.

पावनखिंडीतील घनघोर लढाई

कसे जाल: कोल्हापुर पासुन विशाळगड ७५ कि मी वर आहे.विशाळगडाच्या ८ किमी अलिकडे पावनखिंड आहे.शासनाने आता पावनखिंडचा विकास केला आहे.पुर्वी येथे काही नव्हते.मी व माझे मित्र विक्रम धनवडे या ठिकाणी जाऊन योध्दयांच्या स्म्रूतिला आभिवादन केले.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498