Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आर्वी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आर्वी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, जुलै ०२, २०१८

९४ व्या वर्षीही तोच जुनून

९४ व्या वर्षीही तोच जुनून

 आर्वी/राजेश सोळंकी:
आजकाल थोडे जरी जायचे असेल तर आजच्या पिढीतील मुलांना युवकांना गाडीशिवाय जमत नाही मात्र हे व्यक्तीमत्व या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालनारे आहेत .. नाबाद ९४ वर्षाचे वय असूनही ते दुकानात सायकलने येने जाने करतात.आजहि ते मैलोन मैल सायकलनेच प्रवास करतात.त्याचसोबत स्वतंत्रपूर्व काळाचे ते साक्षीदार देखील आहे.मुरलीधर उकंडराव गुल्हाने ( वय ९४) हे या व्यक्तीमत्वाचे नाव .
आर्वीतिल त्या काळातील कसबा येथे १९२४ मध्ये त्यांचा जन्म झाला.. येथील न प शाळेत शिक्षण घेउन त्यांनी १९४३ मध्ये इथिल नेहरू मार्केट जवळ न्यु बोम्बे सायकल स्टोअर्स चे नावाने सायकल चा व्यवसाय सुरु केला त्या काळी सायकल म्हणजे प्रतिष्ठा होती.. नवीन सायकल विक्री टायर्स सायकल रिपिरिंग कलरपेंटिंग सर्व सायकलचे स्पेअर पार्ट विक्रीस ठेउन व्यवसाय सुरु केला त्याकाळी १आना तास प्रमाने सायकल ट्याक्सि किरायाने दिल्या जात होती.त्याकाळी त्यांचेजवळ १४ सायकल ट्याक्सि होत्या.हरकुलर्स बि एस ए सायकल कंपनीचि एजंसि त्यांचेकडे होती.आताही त्यांचा हा व्यवसाय अव्याहतपणे सुरु आहे. मात्र आता या गाड्यांचे काळात सायकल ट्याक्सि किरायाने देने बंद केले आहे या व्यवसाय मध्ये त्याचा मुलगा विकास त्याना मदत सहकार्य करतो . 
आजही अनेक कामे ते सायकलने च करतात.आर्वी परिसरातील स्वातंत्र्यपुर्व काळातील अनेक घडामोडीचे ते साक्षीदार आहेत. 























सोमवार, जून १८, २०१८

बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटिबद्ध

बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटिबद्ध

आर्वी/प्रतिनिधी:
Governance is committed to protect the villages of Bore Tiger Reserve | बोर व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटिबद्धआर्वी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे बोर व्याघ्र प्रकल्पात आले आहेत. यामुळे या गावातील नागरिकांचा वन्य प्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागत आहे. हीच समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले. यावर पालकमंत्र्यांनी या गावांच्या सुरक्षेकरिता शासन कटीबद्व असल्याचे आश्वासन त्यांना दिले.आर्वी तालुक्यातील मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका, मरकसुर, माळेगाव (ठेका), सिंदिविहीरी, सुसुंद व बोरगाव (गोंडी) गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पांमध्ये समावेश करून या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी संबधीत गावकऱ्यांची मागणी व गावांच्या समस्यांबाबत निर्णायक भुमिका घेण्याची गरज माजी आमदार दादाराव केचे यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमक्ष व्यक्त केली. मनुष्य तथा शेतकऱ्यांना शेती करताना होत असलेल्या त्रासाबद्दलची माहिती माजी आमदार केचे यांनी दिली असता सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेऊन कार्य तत्परतेचे उदाहरण देत त्रस्त झालेल्या कुटुंबाकडे लक्ष वेधले. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देखील माजी आमदार दादाराव केचे यांनी पाठपुरवठा केला आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाला लागुन असल्याने वन्य प्राण्यांचा हैदोसाचा त्रास येथील गावकऱ्यांना होत आहे. रोही, रानडुक्कर, वाघ, बिबटे इत्यादी प्राण्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने गावातील आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शिक्षणाकरिता औषधोपचारासाठी तसेच इतर सर्व महत्त्वाच्या कामासाठी गावकऱ्यांना कारंजा, आर्वी, वर्धा, सेलू येथे जावे लागते. या ठिकाणी पोहचण्यासाठी जंगल परिसरातूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर येथील जनजीवन वर्षानुवर्षे प्रभावित झाले आहे.
या गावातील जनतेला त्रासांपासून मुक्त करण्यासाठी गावांचे पुनर्वसन जंगल परीक्षेत्राबाहेर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका, मरकसुर, धानोली, सिंदिविहीरी, सुसुंद व बोरगाव (गोंडी) या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याबाबत माजी आमदार दादाराव केचे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रकाराचे गांभीर्य लक्षात आणून दिले. ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीत हजर असलेल्या गावकºयांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना संबंधित बाबीची विचारणा केली असता या गावांचे पुनर्वसन शक्य नसल्याचे सांगितले.या बैठकीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह गावातील शिष्टमंडळ उपस्थित होते.
उपाययोजना आखण्याकरिता मागितला पाच वर्षांचा आढावा
दादाराव केचे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने अधिकाऱ्यांना गत पाच वर्षातील घटनांचा आढावा मागितला. तसेच ही गावे कोर झोन मध्ये येत नसल्याने या गावांकरिता स्वतंत्र धोरण तयार ग्रामसभेतून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
तसेच पुनर्वसन होईपर्यंत नुकसान भरपाईचे निकष, जंगल परीसराला उच्च कोटीचे कंपाऊंड, वैज्ञानिक दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय या विषयावर चर्चा करण्याकरिता ४ जुलैला बैठक आयोजित आहे.