चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारी मंडळाची सभा नुकतीच धुळे येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, कोल्हापूर हे होते तर राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, चंद्रपूर, कार्याध्यक्ष बळीराम मोरे, रत्नागिरी, कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, नांदेड मुख्य संघटक भूपेश वाघ, धुळे, महिला राज्याध्यक्ष अलका ठाकरे, महिला प्रमुख सल्लागार चंदाताई खांडरे, कोषाध्यक्ष रूखमा पाटील, कार्यकारी सचिव रंगराव वाडकर, उपाध्यक्ष यादवकांत ढवळे, प्रमिला माने विभाग अध्यक्ष राजेश दरेकर, प्रभाकर चौधरी, रवींद्र देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेचे आयोजन उमराव बोरसे यांच्या नेतृत्वात धुळे पुरोगामी जिल्हा शाखेने केले यावेळी विद्यार्थी -शिक्षक हिताचे प्रश्न मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली यात जुनी पेन्शन योजना लागू करणे, मुख्यालय अट स्थगित करणे, सातवा वेतन आयोग मधील त्रुटी दूर करणे, मुलींचा उपस्थिती भत्ता 5 रुपये करणे, शाळाबाह्य कामे बंद करणे, शालेय पोषण आहार संपूर्ण यंत्रणा स्वतंत्रपणे राबवणे, सर्व विषयशिक्षकांना पदवीधर ची वेतनश्रेणी लागू करणे,शाळा देखभाल साठी समग्र शिक्षा अभियान मधून किमान 25 हजार अनुदान मिळावे, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून 3 दिवस पूरक आहार मिळावा, इंग्रजी विषयासाठी स्वतंत्र पदवीधर विषय शिक्षक मिळावा,Mscit मुदतवाढ बाबत शासननिर्णय त्वरित पारित व्हावा.
सर्व विद्यार्थ्यांना भेदभाव विरहित गणवेश मिळावा
राष्ट्रीय राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळावी, ऑनलाईन कामे बंद करावी, केद्रावर एक डेटा एन्ट्री ऑपरेटर द्यावा व blo ची कामे बंद करावी, निवडश्रेणी बाबत टक्केवारीची अट रद्द करावी, जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात, रिक्त पदावर पदोन्नत्या कराव्यात, सर्व शाळेला शिपाई व केंद्राला क्लार्क मिळावे व अन्य असे 20 ठराव पारित करण्यात आले. सर्व समस्यांचा पाठपुरावा राज्यस्तरावर करण्यात येणार आहे.
सदर सभेत निखिल तांबोळी कोषाध्यक्ष, गजानन चिंचोळकर उपाध्यक्ष, लोमेश येलमुले कार्यकारी सचिव यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले व जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या मांडल्या.