“इथिकल हॅकींग व सायबर सिक्युरिटी” कार्यशाळा
दत्ताञय फडतरे (पुणे )
भोर तालुक्यात गेल्या आठवड्यात दिनांक १५ व १६ फेब्रुवारी रोजी अनंतराव थोपटे महाविद्यालयात दोन दिवसाचे राज्यस्तरीय “इथिकल हॅकींग व सायबर सिक्युरिटी” याबाबत साईन सोल्युशन प्रा. लि. तसेच थोपटे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळा आयोजित केली होती.
सद्यस्थितीत समाजामधे सायबर क्राईमचा आलेख उंचावत आहे. तसेच सध्या डिजिटल क्रांती जोरात आहे. अनेक काम तसेच व्यवहार आज डिजिटलच्या माध्यमातून होत असतात. तसेच वाढत्या डिजिटल यंत्रणेमधून गुन्ह्यांची वाढ होत आहे. या सर्व विषयाची समाजाला माहिती व्हावी तसेच जागरुकता वाढावी याकरिता साइन सोल्युशन प्रा. लि.चे संचालक अभिजित मोरे यांनी “सायबर क्राईम हेल्पलाईन”चे उद्घाटन केले. तसेच या हेल्पलाईनचा क्रमांक 18002677798 सुरु करण्यात आला.
याप्रसंगी श्री पराग आवटे (माननीय दिवाणी न्यायाधीश, भोर), डॉ. प्रसन्नकुमार देशमुख (प्राचार्य अनंतराव थोपटे महाविद्यालय), श्री अभिजीत अशोक मोरे (संचालक, साइन सोलूशन्स प्रा. लि.), श्री महेश चव्हाण (सहाय्यक पोलिस निरिक्षक, पुणे ग्रामीण सायबर सेल), संदीप गादिया (सायबर एक्सपर्ट) आदि उपस्थित होते.