Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७

शहरातून निघाली एड्स जनजागृती रॅली

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने(UNO-United Nations Organization) घोषित केले आहे. त्यामुळे आज चंद्रपूर शहरातूनही एड्स बाबत जनजागृती करीत जिल्हा सामान्य रुग्णालयातून हि रॅली मुख्य मार्गाने होत शहरातून मार्गस्त झाली. यावेळी रोटरी क्लॉब, इनरव्हील क्लॉब,  जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी डॉकटर्स व शाळकरी विद्यार्थी आदी सहभागी झाले होते. यावेळी सर्वांना एड्स बाबत  माहिती व शपथ देण्यात आली.

‘एड्स’ हा शब्द उच्चारायला आणि लिहायला अतिशय सोपा, मात्र हा रोग सोपा नाही. कुणाला ह्या रोगाची लागण झाली असे साधे माहिती जरी पडले तरीही अंगावर काटे उभे राहतात. पूर्वी कर्करोग हा सर्वांत भयानक रोग मानला जाई, मात्र ‘एड्स’ ह्या रोगाचा शोध लागल्यानंतर त्यालाच सर्वांत भयंकर रोग मानले जाऊ लागले. कर्करोगावर आता इलाज निघालेत. चांगले उपचार किंवा शस्त्रक्रिया करून कर्करोग बराही होऊ शकतो. मात्र, १९८१ साली एड्सच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाल्यानंतर आजतागायत ह्या रोगावर इलाज, औषध, लस किंवा हा रोग पळवून लावणारी उपचारपद्धती यांचा शोध लागला नाही. काही लोक तसा दावा जरी करत असले तरी त्यामागील सत्यता अजूनही बाहेर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आज जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने शहरातून हि रॅली काढण्यात आली.
 एड्स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र असे म्हणून गाफील राहून चालणार नाही.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.